STORYMIRROR

Vanita Shinde

Others

3  

Vanita Shinde

Others

मी बंदिस्त

मी बंदिस्त

1 min
13.4K


आहे मी बंदिस्त नारी

ना मज कशाचे स्वातंत्र्य,

लादलेत मजवरी बंधने

आजही जीवनी पारतंत्र्य.


केला जातो फक्त दिखावा

आहे स्वतंत्र स्वछंदी नारी,

घुसमट मनाची क्षणोक्षणी

कैदखाना मज पडतो भारी.


अन्न,वस्त्र, निवा-यासाठी

नाही कधी मुभा कसली,

पुरुषी नजरा टक लावूनी

दर्शवतात वासना अस्सली.


कर्तव्याचा पाढा नित्य

वाचला जातो अहंकारे,

पुरुष प्रधान संस्कृतीचे

आजही वाहत आहे वारे.


लज्जा रक्षण करताना

जीव येतो मेटाकुटीला,

संस्कृतीच्या नावाखाली

नारीलाच धरतात वेठीला.


स्त्री पुरुष एकसमान हा

कायदा केवळ संविधानी,

तुच्छ लेखूनी स्त्री वर्गाला

पुरुषच करतात मनमानी.


जन्म घेऊनी भूमीवर

झाले मी बंदिस्त नार,

संस्कार अन् कर्तव्याचा

डोईवरती सोसते भार.


Rate this content
Log in