मी बंदिस्त ( अभंग रचना )
मी बंदिस्त ( अभंग रचना )
1 min
13.6K
निर्बंध सारेच | लादे माझ्यावर ॥
बंद सारी व्दार | मी बंदिस्त ॥१॥
घरची ती लक्ष्मी | घरात रहावी ॥
बाहेर पडावी I अनुमते ॥२॥
चुल आणि मुल I हवाच सांभाळ ॥
आणावे ते बळ I कसे बरे ? ॥३॥
नोकरी करावी I घर ही सांभाळी ॥
कष्टच का भाळी I लिहलेले ॥४॥
ही मानसिकता | पुरुष सत्ताक ॥
कुठवर धाक I स्त्री जन्माला ॥५॥