मेंहदी
मेंहदी
सखी..... लावून साज चढवला आता तरी ये ना ... माझ्या या रुपाला हातातील मेंहदीला बघ ना... कसे जगणार मी सख्या हे जीवन तुझ्याविना मेंहदीचा रंग पण आता हरवला तुझ्याविना.... दुरवर होते चालायचे कसे तुटले हे अंतर रस्त्यावर आता तुला विसरण्याचा नाही दिला मंतर... प्रियकर.... नको सखी मला दोष देऊ कसे हे काटले मी अंतर तुझ्या सुखासाठी मी ओढली दु:खाची चादर... जगातील सुखाचा ठेवा होता माझ्याकडे ग कमी आयुष्याची माझ्या आता संपली आता ग उर्मी... काही क्षणातच मी होता चा ग नव्हता होणार या भुतकाळात मी आता विद्यमान ग होणार... आयुष्य आणखीन तुझे जगायचे ग बाकी.. म्हणून घे काढून तु मेंहदीची सगळी झाकी... नको मला शोधू आता रचली हातात आता मेंहदी जग थोडे आता या मेंहदीवानी स्वतः झिजून दुसऱ्याला रंग देते मेंहदी.. स्वतः झिजून दुसऱ्याला रंग देते मेंहदी..
