STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

मेघधारा

मेघधारा

1 min
125

नभातून जलाचे

उतरले मोती

शहारून गेली

ओलावली माती


अंगावर झेलुनी

थंड मेघधारा

चकाकू लागली

गवताची पाती


इंद्रधनू कौतुके

न्याहाळे धरती

हिरव्या निसर्गात

पक्षी आनंदे गाती


संतोषली सृष्टी

लता, तरू बहरली

रिमझिम पावसात

सान, थोर सुखावली


साहित्याला गुण द्या
लॉग इन