मेघ काळा
मेघ काळा
1 min
14K
आभाळाला मेघ काळा होई भार ।
माळरानी झाले पाणी आरपार ।
कोसळतो सारखा तो डोंगरात ।
चिंब ओली भुई झाली दिनरात ।।1।।
नदीपूर भरपूर बांध मोडी ।
झाली दाट रानवाट नागमोडी ।
जर्दरंगी धरा रंगी लाजलेली ।
लावी वेड सांजवेळ भिजलेली ।।2।।
जिथे तिथे प्रेमगीते पाखरांची ।
हिरवीकाळी पिसे निळी मोरांची ।
सौंदर्याने भिजलेला पावसाळा ।
दुःखे सारी दूर सारी मेघ काळा ।।3।।
