STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

मौन

मौन

1 min
41.3K


मौनाचा एकान्त कोपरा

देवळाचा देव्हारा

मृगजळाच्या मोहक स्वप्नात

श्रावणसागर बरसला

मौनाचे माझ्या निर्माल्य

सुकलेली ओंजळभर फुलं

मौनातच मोहरतील

सुगंधी उमलती फुलं

मौनाचे जंगल

मौनाचाच वणवा

जाळुनही जाळलेलं

मेघापर्यंत पोहचलेलं

स्पर्श रूप मौनाचे

क्षितीजाशी तुलनेचे

आकाशाची शांतता

कातरवेळी पाहायची

काळोखाशी बोलत राहते

मनात एकट्या ठसलेली

मौन एक प्रीत अशी

एकटीच बोलते मनाशी कशी ??


Rate this content
Log in