STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

मैत्री

मैत्री

1 min
18.3K




नाते जगावेगळे असे मैत्रीचे

अलवार सुखद अन् खात्रीचे


जुळतात जेव्हा भावपूर्ण बंध

दरवळू लागतो मैत्रीचा गंध


भेद कोणताही मैत्रीत अमान्य

राव-रंक सारे असते नगण्य


नात्याहूनि रक्ताच्या मैत्रीच श्रेष्ठ

कोणी नसे मोठा नाहीच कनिष्ठ


कोणी असता अनाथ,नाते नसे

हात मैत्रीचा जीवना पुरतसे


अशी ही मैत्री जपावी जीवापाड

पुरविते हट्ट ती करिते लाड.


Rate this content
Log in