मैत्री
मैत्री


मैत्री मैत्री काय असते
कुणासाठी ती जग असते
कुणासाठी ती आगीची धग असते
कुणी म्हणे प्रेमाचे प्रतीक
त्याचवेळी कुणातरी रागाचे ते रोष
मैत्री म्हणजे काय असते
मित्रीच्या त्या कट्ट्यावर
प्रेमाच्या गप्पाटप्पा चाले
त्याच कट्ट्यावर कुण्या
लेकीला एसीडने मारे
मैत्री म्हणजे काय असते
जीवा जीवांचा तो मनाचा संबंध
एकमेकांसाठी जीव देणे आता
झाले आहे बंद
मैत्री म्हणजे काय असते
कधी कृष्णाचा , सुदामा
कधी शेतकऱ्याची , गाय
कधी रामाचा चे हनुमंत
कधी बाप्पाचे चे मूषक
मैत्री म्हणजे काय असते
आता सांगणे कठीण आहे
साऱ्या स्वार्थी जगामध्ये
कामा पुरते मामा बसून आहे
मैत्री म्हणजे काय असते
पूर्वीचे मित्र आठवणे
आणि त्याच मित्रांसोबत
फक्त लहान मूल होणे