मैत्री तुझी माझी
मैत्री तुझी माझी


भाग्यवान मी
मित्र म्हणून
तू भेटलास
तुझ्यासारखा जीव
आजवर कोणी नाही लावला
नशीबवान आहोत
म्हणून एकमेकांचे
मित्र झालो
सुख-दुःखाच्या काळात
नेहमीच सोबत राहिलो
छान वाटतं मला
तुझं मला समजावणं
तेवढ्याच हक्कानं
माझं सारं ऐकून घेणं
मैत्रीत आपल्या
कोणतेच नाही हेवेदावे
आपली मैत्री पाहून
सार्यानेच आपले गुण गावे
त्रास होता मला
तुला लगेच कळतं
माझ्या मनातले गुज
तुला लगेच समजतं
माझ्या एका फोनवर<
/p>
येतोस तू लगेच धावून
ठरवून कधी वागत नाहीस
काळ वेळ पाहून
मैत्री आपली सच्ची आहे
बाकी नाती कच्ची आहे
आपल्यात कधीच ना
स्वार्थ यावा
ना कोणामुळे दुरावा यावा
तुला माझ्या प्रत्येक गोष्टीचं
असतं भारीच कौतुक
मला जरा जरी त्रास झाला तर
होतोस तू लगेच भावुक
सारे म्हणतात मैत्री असावी
तर तुमच्यासारखी
कुठेही गेलो तरी एकत्र असते
जोडगिळ आमची
आपल्या मैत्रीला
कोणाची नजर न लागावी
आपली ही सच्ची मैत्री
जन्मोजन्मी अशीच असावी