मैत्री शाळेतील
मैत्री शाळेतील

1 min

23.5K
आठवणींचे पिंपळपान पाहिले निरखून
रम्य असा भुतकाळ हसला डोकावून
शाळेतील जिवाभावाची मैत्रीण मला दिसली
माझ्याकडे पाहून गोड गाली हसली
एका बाकावरच्या रंगलेल्या गप्पा
मनाला मोरपिसासारख्या स्पर्शून गेल्या
कट्टी, बट्टी, रुसवा तर कधी अबोला
तरीही भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या
अहंकार, गर्व याचा गंध नव्हता नात्याला
म्हणूनच रंग होता मैत्रीच्या सोहळ्याला
आठवणींच्या संदुकात अजूनही जपलेली
गोड मैत्री तुझी नि माझी शाळेतली