मैत्री शाळेतील
मैत्री शाळेतील

1 min

11.8K
राणी, बंटी आणि आनू
नाव तरी किती सांगू
भावायचा स्मिताचा साधेपणा
योगीताला नसायचा मीपणा
घट्ट आमचे मैत्रीचे नाते झाले
लोणच्यासारखे खूप मुरत गेले
रुसवा फुगवी तर अधूनमधून चालायची
त्याशिवाय मजा नाही यायची
गाण्याच्या भेंड्या अन् अंगतपंगत
भारी वाटायची सगळ्यांची संगत
अजूनही जपली आम्ही बालपणीची मैत्री
वर्षांतून एकदा भेटण्याची देतो एकमेकींना खात्री