STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

माय

माय

1 min
677



कोणी पाहिला का कधी

पृथ्वीवर कल्पवृक्ष..?

माझी माय त्याचेपरी

ममत्वाची देते साक्ष..


तिच्या उरी पाझरतों

झरा अमृत क्षीराचा..

तिच्या ऋणात वाहतो

कणकण रूधिराचा.


काळेशार दोन डोळे

जणू मेघ वात्सल्याचे..

तिच्या लेकरासाठी ती

वरदान कैवल्याचे..


रुपवती या जगात

आहे सौज्वळ ती मूर्ती..

हृदयातला प्राणवायू

नित्य गातो तिची किर्ती...


कनवाळू तिच्यासम

साऱ्या जगी कोणी नाही..

ज्यांना लाभली माऊली

त्यांना काही कमी नाही..


मातीआड होता मूर्ती

पुन्हा दिसणार नाही..

तुझे पाहुनी कौतूक

पुन्हा हसणार नाही..


तिच्या हरेक शब्दाला

येई कारुण्याचा गंध..

राहू द्यावे तुम्ही घट्ट

तिच्या नाळेशी तों बंध..


Rate this content
Log in