मावळतीचं स्वप्न
मावळतीचं स्वप्न


स्वप्न मावळतीचं भरल्या डोळ्यात होतं
संपलं सारं काही विसरून जगायचं होतं
दिल्याघेतल्या वचनांची उजळणी ती
अश्रुं भरली ओंजळीत बरसात होती..
स्वप्न मावळतीच भरल्या डोळ्यात होत
आजवर घातली पाखरं ह्या मायेची होती
सुटू पहाते ती नाती जी घट्ट वीणली होती
आशा ऊद्याची कल्पाया शेवटची ती आस होती
भरल्या मनीच्या गाभार्यात भावनिक कोंडी ती
स्वप्न मावळतीच भरल्या डोळ्यात होत.
आयुष्याची गणित काही अनुत्तरीतच होती..
विचारावं कोणास, कोणीच तर आपलं नव्हत ..
ठेवले जपूनी भास जे ओसंडून वाहत होते
तुटलेल्या मनीच्या त्या खंडित तारा होत्या..
स्वप्न मावळतीच भरल्या डोळ्यात होत..
अश्रुं भरली ओंजळीत बरसात होती..
स्वप्न मावळतीचं भरल्या डोळ्यात होतं