माठ
माठ

1 min

141
काळा काळा
गोल माठ
वेगळाच आहे
त्याचा थाट
पाणी पडते
थंडगार जबरदस्त
वाटते प्यायला
अगदी मस्त
त्यातील पाणी
आहे सुरक्षित
वापरण्यात आहे
सर्वांचे हित
कावळ्यालाही वाटे
त्याचे आकर्षण
येई करायला
पाण्याचे प्राशन
तृप्त होते
मन पिऊन
आह शब्द
तोंडातून निघून