मातीमधल्या रुजवाती
मातीमधल्या रुजवाती
1 min
228
अंधुक सकाळी, धूसर ओलेती झाडे
मनही जाते मागे, गावाची ओढ लागे
मऊ धुक्याची साय, शेतभर पसरलेली
जुन्या भेटीची आस, मनभरून मोहरलेली
लोम्ब्या झुंजतात वाऱ्याशी, कोवळं ऊन दाराशी
आठवणींचा गोफ अस्साच खेळतो मनाशी
थंडीत जसे जन्मावेत, गवतावरले मोती
मातीमध्येच रुजाव्यात, जगण्याच्या रुजवाती
