STORYMIRROR

Anagha Kamat

Others

4  

Anagha Kamat

Others

मातीची भांडीं

मातीची भांडीं

1 min
208


कुंभार बनवितो भांडीं

इथे तिथे माती सांडी

माती तुडवितो पांयानी

मडकीं घडवितो हातांनी

आधी दुखवितो मातीला 

पणास लावतो आत्मकलेला

सुरेख मडकीं , हंडी माठ

गरीबांच्या घरी मातीचाच थाट

मातीच्या मडक्यांत जेवण रुचकर

बघुनच होते भूक जास्तच प्रखर

मडक्यांतले दुध लागते गोड

मिळते दाट दाट सायीची जोड

धुवायची अगदी हलक्या हातांनी

जपावी आपल्या कोमल बोटांनी

बाळाला धुपाटणे मातीचेच

प्यायला गोड पाणी माठाचेच

कुंडी मातीचीच बगिच्यांतली

रोप गर्रकन वाढते ब-यापैकी

ज्यांच्या घरी भांडीं मातीचींच

पर्वा नसते त्यांना कशाचीच

असे सुंदर असते कुंभाराचे काम

वापरा तुम्ही जास्त नसतो हो दाम


Rate this content
Log in