माते जगदंबे
माते जगदंबे
1 min
359
माते जगदंबे
करी मनोभावे
नमन तुजला
पूर्ण भक्तिभावे
माजला जगात
का गे ऊतमात
जाण खरा भाव
भक्ती मन्मनात
संकटांचा वेढा
पडला जगाला
रक्षावे आम्हांसी
विनंती तुजला
नवरात्रारंभ
षोडषोपचारे
पूजा भक्तीभावे
भक्तगण सारे
मानस भक्तांचे
जाणसी गे माते
बळ दे आम्हांसी
माते विनविते
तुझी कृपादृष्टी
चराचरावरी
उदंड सौभाग्य
वर देवी देई
