मास्क...
मास्क...

1 min

2.9K
कधी दुरचा होता संबंध तुझ्याशी...
डॉक्टरच्या तोंडावर तू राही...
तुझे असणे नव्हते एवढे गरजेचे
तुला विकत पण कधी घेतले नव्हते....
आज आली अशी परिस्थिती
तुझ्याशिवाय बाहेर पडण्यास वाटते भीती...
तुझं आहे आता सुरक्षाकवच...
विषाणूपासुन दूर राहण्यास मदत...
तू दिसशी जिथे तिथे...
तुझ्याशिवाय जगणे झाले धोक्याचे...