Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational Others

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational Others

मार्ग सत्याचा

मार्ग सत्याचा

1 min
155

जन्म झाला पोरबंदरला

पावन झाली समस्त नगरी

सुसंस्कृत व सुशिक्षित कुटूंब

होती आजोबांकडे दिवाणगिरी.......१

धार्मिक व सदाचारी संस्कारात

 मिळाले बाळकडू जन्मदात्यांकडून

अहिंसात्मक सत्याग्रहाची झाली

मनोभूमिका लहानपणापासून..........२

मित्रांच्या प्रलोभनांना न भूलता

जपले स्वत:चे चारित्र्य व शील

पचविला मातेच्या निधनाचा धक्का

गांधीजी तरबेज व सहनशील........३

सोसले अपमान व मारहाण

बळी पडले वर्णद्वेषाला अनेकदा

सत्याग्रहाची चळवळ उभारली

बिमोड करण्यास्तव ब्रिटिश कायदा........४

सत्य व अहिंसेच्या मार्गाने

चले जाव,भारत छोड़ो,दांडी यात्रा

स्वदेशी व अपरिग्रह इत्यांदीची

उपयोगी स्वातंत्र्यासाठी मात्रा..........५

Rate this content
Log in