मानवता..
मानवता..
माहीती नाही आज झाली कुठे लूप्त ती
वसत असे मानवाच्या हृदयात कधी ती
कुठे सापडेल कोणी दयाल का पत्ता?
मी निघालो शोधण्यास जगी मानवता.
होती जेव्हा ती कोणीच एकटा नव्हता.
सर्व जगाचा कारभार तिच्याच मूळ होता.
तिच्याविना भयाण आता जगाची व्यथा.
मी निघालो शोधण्यास जगी मानवता.
जीर्ण लक्तरांना न मोल राहिले आता.
तसेच आई बाप वृद्धाश्रमी सोडून येता .
पिळून जात हृदय अन् फिरतो माझा माथा
मी निघालो शोधण्यास जगी मानवता
कित्येक कळ्या तुम्ही वेलीवरचीं खुडता
महिला सबलीकरण उगाचच बडबडता.
मग खोट्या वाटतात आधुनिक बाता.
मी निघालो शोधण्यास जगी मानवता.
निरुपयोगी अशी कुत्री विकत घेऊन येता.
त्या प्राण्यांची जिवापाड देखभाल ही करता.
तोंड वेंगाळतात भिकारी रस्त्यांवर पाहता.
मी निघालो शोधण्यास जगी मानवता
करा मदतही गरजूंना घ्या समजून व्यथा.
सलाम करायला तुम्हाला मग झुकेल माथा.
जागे रहा मानवांनो जागी असू द्या मानवता.
अनुभवू द्या जगाला तुमची मानवता.
