मानवी जीवन
मानवी जीवन


जन्मा आला जो जो जीव
मृत्यू त्याचा ठरला आहे
सगळ्यांना पुरुन इथे
कोण अमर उरला आहे
आला कोण गेला कोण
फरक कुणा पडत नाही
येण्याने वा जाण्याने
कुणाचे काही अडत नाही
असण्याने किंवा नसण्याने
दु:ख कुणाचे सरत नाही
किती आले किती गेले
एखादी जागा भरत नाही
तरीपण असता कोणी जवळ
जगण्यासाठी मिळतं बळ
आनंद दु:ख होते साजरे
हे ही आहे तितकेच खरे
म्हणून माणसा लक्षात ठेव
देह संपला तुझा जरी
या देहामागे जगामध्ये
शब्द तुझे उरतील परी
आपुलकीचे हे शब्द तुझे
खरा आधार बनून जातील
मरगळलेली एकाकी मने
तुला आशिष देऊन जातील...