STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मानसिकता..!

मानसिकता..!

2 mins
802


मानसिकता....!


आज जरा मोठ्या उत्साहात

पहाटेच फिरायला बाहेर पडलो

थंडी मी म्हणत होती

गार गार मंद वारा झोंबत होता

कोपऱ्यावर शेकोटी पेटली होती


चार पाच मंडळी गरम होत होती

मीही हात धुवून घेतला

अंगात थोडा उबारा भरून घेतला

तो राजा चादर बाजूला सारून

पूर्वेला आळस झटकून आला


म्हंटल थांब रोज नजरेला नजर देत नाहीस

आता तुझा फोटो काढतो

तसा म्हणाला अरे अरे थांब

थंडी ,फोटो पाहून मला चिडवेल


फोटो माझा असा गारठलेला काढू नको

आणि थंडीला दाखवू नको, ती माजेल..!

बरं म्हंटले आणि मी रस्ता

तुडवत तुडवत जाऊ लागलो

वाटेत एक मित्र भेटला आणि

माझे डोळे खाडकन उघडले


गम्मत अशी की त्याने चौकशी केली

आणि सकाळी सकाळी माझी फिरकी घेतली

मतदान कुठवर झाले?मला विचारले

आणि उगाचच मुद्दामून फटकारले

शांत झालो म्हंटले आज करतील मतदान

काळजीच तस काही कारण नाही


विश्वासाची माणसं आहेत तुमच्या सारखी

त्यामुळे मी चिंता विशेष कधी करत नाही

माझी माणसं शब्द पाळतात

मलाच न विसरता आपलं मत देतात

म्हंटलआपण मतदान केलं का...?

मला आपलं बहुमोल मत दिल का.?


आश्चर्य वाटले त्याचे उत्तर ऐकून

मतदान मागीतले होते मी माणसे मोजून

त्या यादीत त्याचे नावच नव्हते आणि

धाडस त्याने खोटे बोलण्याचे केले होते

वाटलं काय ही मानसिकता आपली

दिवसच खोट्याने आपला सुरू होतो


एका मता साठी सुद्धा सहज खोटे बोलतो

आणि इज्जतदार म्हणून समाजात वावरतो

म्हंटल आता आज शेवटचा दिवस

मत कोणा कडे मागायचे नाही

उगाचच मतदाराला आजतरी निदान

खिटे बोलायला भाग पाडायचे नाही


असतील मतदार मनासी प्रामाणिक

तर मला मतदान आपणहून करतील

नववर्षाचे स्वागत प्रामाणिकपणे करण्या

न चुकता आपलं बहुमोल मत मला देतील

म्हंटल मनासी आपण आपलं


मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा देऊया

सकाळी सकाळी सकाळी सर्वांना

आनंदाने सुप्रभात आवर्जुन म्हणूया

नववर्ष माझ्या मित्रमैत्रिणींनो

सर्वांना सुखासमाधाचे समृद्धीचे जाऊ दे

सर्वांच्या जीवनात अखंड आनंद

परनेश्वर कृपेने अविरत सदैव नांदू दे....!

सुप्रभात....!


Rate this content
Log in