माणुसकी
माणुसकी

1 min

37
माणसातली हरवली माणुसकी
आटली सारी आपुलकी
प्रत्येकजण बघतो स्वतःचे
पडले नाही दुसऱ्यांचे
संपला तो जिव्हाळा
लुप्त झाला लळा
कोणीच कोणाला विचारेना
चित्र हे बघवेना
घेतला जातो गैरफायदा
मोडला जातो कायदा
आखले गेले कुंपण
कुठे गेली गुंफण
मने झाली संकुचित
परिस्थिती गंभीर चकीत
वाढत गेला दुरावा
कळत नाही कावा
नसेल कोणताच गेम
कधी वाढेल प्रेम
मिळेल साऱ्यांना आदर
होईल प्रत्येकाची कदर