माणसांचा अफाट समुद्र
माणसांचा अफाट समुद्र
1 min
27.5K
माणसांच्या अफाट समुद्रात
किनार्यालगतच असुनही
अंधाराचा प्रभाव प्रकाशावर ईथे
असे निर्जन बेटासम मन माझे ।।
लावले एकदा दिवे ऊजेडाचे
आलेल्या त्या एका फिरस्त्याने
अंधाराचा प्रकाश नाहीच झाला
हिरमुसल्या मनाने तो परतला ।।
मोह वाईटच आवडलेल्या गोष्टींचा
कष्टी होईल मन हेही माहीत असते
स्वप्नांना नसते किंमत वास्तवात कधी
म्हणून थांबवणे भल्याचे कधी कधी ।।
प्रेम जिव्हाळ्याच्या भाषेचे होते ओझे
नको ते वसवणे प्रेमनगर नव्याने
बरे माझ्या साठी माझ्या परीचयाचे
असे निर्जन बेटासम मन माझे ।।
