मांगल्याची रांगोळी
मांगल्याची रांगोळी
1 min
11.9K
पहाटेच्या प्रसन्न वेळीं
आजी घाली अंगणी रांगोळी
कधी सुरेख ठिपक्यांची
कधी सुंदर फुलांची
शेणाच्या त्या अंगणात
गेरूचा रंग खुलुन दिसे
त्या गेरूच्या रंगावरती
रांगोळी मनमोहक भासे
सण समारंभला तर
रंगांची उधळण असे
सुंदर रांगोळ्यांनी मग
अंगणात शोभा दिसे
रांगोळी म्हणजे मांगल्याची खूण
आनंदी होई मन तिला पाहून
रांगोळीने वाटे शुभ कार्य पूर्ण
तिच्याविना आहे दिवाळी सण अपूर्ण
उत्सवात देवळात शोभा ती वाढवते
तिच्या असण्याने लग्न कार्य ही सजते
रांगोळीचा हा वारसा ठेवूया जपून
तुळशी वृंदावनी तिला मान देऊन