मामाची बैलगाडी
मामाची बैलगाडी
1 min
15.8K
मामाने आणली हो
नवी एक बैलगाडी.
बैलगाडीला जुंपली
सर्जाराजाची जोडी.
मामाची बैलगाडी
किती किती छान.
बैलजोडी पाहून
हरवते देह भान.
गाडी सजवण्यात
मामा असतो दंग.
गाडीला देतो सदा
वेगवेगळे छान रंग.
बैलगाडीला बांधले
खुळूखुळू घुंगरू.
गाडीमागे धावते
गायीचे वासरू.
बैलगाडीच्या बाजूने
लावलेत दोन आरसे
मामाने खुशीत केले
बैलगाडीचे बारसे
