STORYMIRROR

Vijay Sanap

Others

1  

Vijay Sanap

Others

माळ्याच्या मळ्यात

माळ्याच्या मळ्यात

1 min
3.1K


शेताच्या बांधावर कोण गं उभी

भाजी घेते मी भावजी

भावजी वाट नका पाहूजी

जावा घराकडं ।।


अंधाराच्या आधी बाई मी

वाटेला लागले गं

ठेच लागता पायाला मी

भलतीच घाबरे गं

खुडखूड करतय जाळीमधी

कसं तरी होतय उरामधी

भावजी वाट नका पाहूजी

जावा घराकडं ।।


काल रातीला सपनामधी

गण्या भावजी आला गं

झोपेमधी असताना मी

मला जागवूनी गेला गं

काळीज माझं धडधड करी

जीव उडतो वरच्यावरी

भावजी वाट नका पाहूजी

जावा घराकडं ।।


घागर घेऊन पाण्या जाता

वाटेला आडवा गं

पदर ओढूनी खोड्या करुनी

गोंधळ घातला गं

रंग सावळा हाती पावा

कृष्ण देवाचा केला धावा

भावजी वाट नका पाहूजी

जावा घराकडं ।।


Rate this content
Log in