STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

4  

गोविंद ठोंबरे

Others

माझ्या दगडातला देव!

माझ्या दगडातला देव!

1 min
27.4K


होय दगडाच्या देवालाच मी रोज पूजतो
अन सोन्याच्या मुलाम्याने देवळाला रंगवतो
साजूक तुपाने रोज देवाला नाहू घालतो
अन चांदीच्या ताटानेच त्याला ओवाळतो

दगडातही तो मला रोज मोहक दिसतो
सोन्याहूनही अमोल भाव मनात भरवतो
तुपाची गोडी मी रोज अभंगज्ञानी चाखतो
अन चांदीपरि देवा मी रोज चमकतो

तुझ्याच ग्रंथसागरात मला जगप्राप्ती होते
अन श्रद्धेच्या आवारात दुःखाची कांती गळते
सद्सदविवेकात सदनी सुखी छाया येते
तुझ्या दगड रूपातच देवा दुर्गुणी छटा जळते

संत प्रबोधिनी देवा तुझ्यानेच शिकवण देते
अंधत्वाचं ग्रहण माझ्या मुळासकट उखडते
नसेल तुझ्या दगडात जीव पण मला बरे वाटते
तुझ्या श्रद्धेपायी सारं जग सुखी नांदते

नसेल कोणासी खपत देवा सांग स्वप्नी जाऊन
ये म्हणा एकदा विठुरायाची वारी करून
नाही गावायचा देव तुला तुझ्या मनापरी,
पण सांग म्हणा त्याला आलास ना माणूस होऊन..


Rate this content
Log in