STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

माझ्या अंगणी ( हायकू )

माझ्या अंगणी ( हायकू )

1 min
629


माझ्या अंगणी

( हायकू )


माझ्या अंगणी

जणू शाळा भरती

चिव चिव ती


माझ्या अंगणी

सजे रांगोळी रंग

जसे अभंग


माझ्या अंगणी

उपाशी कोणी आला

तृप्त तो झाला


माझ्या अंगणी

इवलेसे पाऊल

सुख चाहुल


माझ्या अंगणी

चांदणे वेचायला

या पौर्णिमेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन