STORYMIRROR

Balika Shinde

Others

4  

Balika Shinde

Others

माझं इवलस रोपटं

माझं इवलस रोपटं

1 min
27.6K


माझ्या घराच्या अंगणात इवलसं रोपटं वाढतय.....

हवेच्या झुळेकेसोबत हळूहळू झुलतय.....


रोज मी घालत असलेल्या पाण्याने आपली तहान भागवतय...

माझ्या प्रेमाच्या स्पर्शाने अजून ते खुलतय.....


नकळत माझ्या सुखदुःखाचा साक्षीदार बनतय....

एकटेपणात मला आपलेपणाची जाणीव करून देतंय....


बोलत नसलं तरी अबोल राहून माझं बोलणं ऐकतय...

काही मनापासून पटलचं तर अलगद मान हलवून होकार दर्शवतय....


हल्ली ते खूप घाबरल्यासारखं वागतय कदाचित कोणाला तरी घाबरतय.....

म्हणून मीही आता त्याला संरक्षण म्हणून *कुंपण* लावण्याचं ठरवलयं......


Rate this content
Log in