माझं गाव
माझं गाव


आयुष्य हे माझे मुंबईत घडले
पण गावच्या शांततेत नेहेमीच मन माझे रमले,
सायंकाळी पडणाऱ्या सूर्याच्या मंत्रमुग्ध त्या रंगछटा पाहता पाहता
माझे नयन नभाच्या अंतरंगात सामावले
हिरवी गार वनराई माझ्या गावची
निळे भोर आकाश पांघरले
नदी ती शुभ्र पांढरी
खळखळत जाते चोहीकडे
घरोघरी विठ्ठल रुक्मिणी
कसे जोडीने अवतरले
वारा तो सैरां वैरा रानीवनी
स्पर्श होताच अंग मोहरले
गावाकडे गोड छान
शहाळ्याचे ते झाड
रातराणी पांघरली
लाल पांढरी ती शाल
कधी येड्या बाभळीचे काटे
कधी गुलाबाची रास
कधी आंब्याच्या झाडाला
तान्हे मुल घेते झुले
शेतकरी माझा रोज
तीळ तीळ तो तुटे
कधी बाजारात धाव
कधी खिशाला त्या घाव
55); color: rgb(51, 51, 51);">मनातले ओठावर येऊ
हळूच गाई हांबरून जाई
नकळत येई मग ती आठव
जसे जशी देवळात लक्ष्मी आई
गावच्या चिऱ्या सांगून जाती
गाव माझा सर्वांचा सांगाती
माणूस मिसळतो एकमेकात
इथे नाही गर्वाची बढती
नवजात बाळाला आजीच्या
मायेची ऊब
कधी ना लाभे ती रुखरुख
शब्द नि शब्द हे कमी पडे
गावाकडे काय उणे बापडे...
सरले मन बहरले
स्वप्नाच्या त्या धुक्यातून
गंध पसरले
गावची चाहूल सुंदर माझ्या
तनामनातून मोहरत जाते
दाट धुक्यातून
निर्मळ झरा तो
पाऊलखुणा अद्भुत
त्या भासे
ऊन बिलगते कधी
सायंकाळ ती बोचते उरी
अचानक धरती कवेत घेती
मनात माझ्या फुले बहरती
निशिगंध तो आणि ती प्राजक्ता
नावांची ही किमया वेगळी
असेच वनराई माझ्या गावी
निःशब्द सारे विश्व व्यापून ठाई
कवेत मज घेता ती रात्र
अंधाराची खंत ना मात्र
मज समीप राहतो तो गाव अहोरात्र
गुण गाईन ते थोडे
मन आभाळ एवढे...