माझी शाळा
माझी शाळा
1 min
3.1K
चला चला रे शाळेला या
सवंगड्यांनो या रे या
नाचु संगे खेळूया
आनंदाने शिकूया ||१||
येथेच आहेत ज्ञानाचे
कल्पतरू फुलवायचे
गुरूजींचा पाठ स्मरता
दूर होई अज्ञानता ||२||
एक होऊनी राहुया
उंच भरारी घेऊया
दिशा गुरुजी दाखविती
शिकवी जगण्याची नीती ||३||
अक्षरे जोडाक्षर वाचुया
अंकाची गंमत पाहुया
बलिदान थोरांचे आठवुया
सलाम त्यांना देऊया ||४||
आई बाबांच्या मायेचे
स्वप्ने आहेत जीवनाचे
शिकून मोठे होऊया
जनांची सेवा करूया ||५||
