Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Others

2  

Shobha Wagle

Others

माझी मराठी

माझी मराठी

1 min
265


मराठी ही

मायबोली

राज्य भाषा

लोक बोली.।।१।।

वर्णमाला

बाराखडी

वेलांंटिची

छान घडी.।।२।।

स्वरांनी व

व्यंजनांनी

भारी मात्रा

दागिन्यांनी.।।३।।

शोभिवंत

वळणांची

सुंदर त्या

अक्षरांची.।।४।।

शिवबांची

मावळ्यांची

ज्ञानेश्वरी

ज्ञानोबांची.।।५।।

तुकोबांच्या

अभंगाची

संत वाणी

साहित्याची.।।६।।

साहित्य ते

सर्व श्रेष्ठ

मराठीचे

जगी जेष्ठ.।।७।।

कुसुमांचा

जन्म दिन

मराठीचा

भाषादिन.।।८।।

आहे मला

अभिमान

ठेऊ तिची

सदा शान.।।९।।

बोल माझे

मराठीचे

माय भाषा

संस्कृतीचे.।।१०।।



Rate this content
Log in