माझी मीच
माझी मीच
1 min
1K
संसाराच्या रहाटगड्यात
गुंतून घेतले स्वतःला
मग कुठे कमी पडेन
ही भीती मज कशाला
संसाराचा रथ चालवताना
कधी गुंतली मी त्यात
आणि घेतला कधी मी
कासरा या हातात
आहे समर्थ माझी मी
साऱ्या कष्टाच्या कामाला
नाही घाबरत येऊ देत
कितीही संकटे वाट्याला
सर्जा राजाच्या संगतीने
माझी मी जगीन खुशाल
मोत्या माझा ग गुणी
साऱ्यांची मायेची पखाल
दाखवू जगाला हिम्मत
सारे काही करण्याची
नका करू आमची चेष्टा
वेळ आलीय जागण्याची
