माझी लेखणी माझे अस्तित्व
माझी लेखणी माझे अस्तित्व

1 min

22.9K
साहित्यातील मी नवी चांदणी
माझी सखी माझी लेखणी
सरस्वतीची पूजा करोनि
शब्दरुपी भावनांची करते मांडणी
आजवर ना केलं कौतुक कोणी
केल्या फक्त टीका टिप्पणी
पण ना हारले कधी हिम्मत
ना थांबली कधीचं माझी लेखणी
आज माझे कौतुक पाहून
तुम्हीही वाजवल्या टाळ्या
पण नुसते कोरडे शब्द
त्यात ना दिसला जिव्हाळा
सदगुरूनी दिली साथ
आशीर्वाद आणि विश्वास
आता ना मागे फिरणे
ध्येयपुर्ती ही पूर्ण करणे
सदगुरुकृपे मिळाले सन्मान
त्यांनाही वाटला असेल अभिमान
एकच प्रार्थना करते चरणी
जपा माझा आत्मसन्मान