माझी कविता
माझी कविता
माझ्या साऱ्या कविता आहेंत
माझ्या हळव्या भावनांचे कुंपण
उलगडतात आयुष्याच्या गाठी
जणू स्नेहबंधाचे कोंदण
रिता होतो शब्दकुंभ
सख्यांसमोर व्यक्त भावना
सुखदुःखाचे उघडुनि दालन
उघडती त्या संवेदना
कधी हसू तर कधी आसू
ढाळतात माझ्या कविता
हळूवार होती वाचक श्रोते
अमृतसेवन तिचे करिता
भक्तीत तल्लीन करुनि
डोलायला लावतात कधी
नामस्मरणाचे महत्व जाणुनि
टळतील तुमच्या सर्व व्याधी
दुखिताच्या मनावर फुंकर
हलकेच देऊन बनवतात खंबीर
तलवारीची तळपती धार
घेऊन येतात शब्द गंभीर
हलकेच घालुनि शीळ
खुणावतात हळव्या मनाला
गोड आलिंगन देऊन शिंपिती
काव्यगंधी अत्तर मनाला
