STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

माझी कविता

माझी कविता

1 min
167


कवितेचा क क आधी

नव्हताच ज्ञात मला.

शब्द झरू लागले नि

जमू लागली ही कला.


मम रचना, कविता

प्राणप्रिय मजसाठी .

नाती जोडली अनेक

हिला फुलविण्यासाठी.


अलवार जपते मी

माझी कविता मनात.

होते कावरीबावरी

येता निपुण जनात.


शिकतेय तीही आता

घट्ट पाय रोवायला.

मदतीने तुमच्याच

जमतेय पोहायला.


माझी कविता अल्लड,

खोडकर ,अवखळ.

ओळखते तीच माझी

तिच्यासाठी तळमळ.


दुखावते ना कधीच

हास्य फुलवी कविता

तृप्ती देतसे मजला

जणू शीतल सरिता.


Rate this content
Log in