*माझी आई*
*माझी आई*
1 min
14.3K
आई माझी
सुंदर ,सुशील अन सदगुणी
आहेत तिच्याकडे संस्कांरांच्या खाणी
असते नेहमी ती व्यस्त
दिसते ती भारदस्त
आई माझी
ज्ञानाचे ज्ञानभांडार
मायेचा सागर
सर्वांचीच ती काळजी घेते निरंतर
आई माझी
शिकते ती नवीन तंत्र
मला दिला जगण्याचा मूलमंत्र
आहे मी आता विचाराने स्वतंत्र
आई माझी
आहे अगदी साधीसुधी
वात्स्यलतेची, सोज्वळतेची ती मूर्ती
सगळीकडे तिचीच कीर्ती
आई माझी
तिचा पुण्याई अपरंपार
म्हणूनच माझी मूर्ती झाली साकार
आई तुझे थोर उपकार
आई तुझे थोर उपकार....
