STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

4  

गोविंद ठोंबरे

Others

माझे मीच!

माझे मीच!

1 min
28.2K


लहानगा होऊनि बरेच शिकलो
शिकलो अनुभवासी गोड चाखूनी
मातीवरच्या ओल्या वासाला
नाही विसरलो दूर राहुनी

थाप घेतली पाठीवरती
नाही वाकलो कष्ट वाहूनी
वाहता वाहता नाही हरवलो
टिकलो घट्ट मूठ आवळुनी

बेदर्दी शरम हया पाहिली
पाहिली भीती काळोख सारुनी
संकटवेळे सामनाही केला
दिला लढा मग ढाल बनुनी

वादळे पेलूनी वर्षा झेलली
मनगटी बळ अन छाती ठोकूनी
अंगावरती घाम झरे उगमली
भाकर कोरडी पोटास गिळूनी

मीच जाणिले मीच शोधिले
गुरू माझे मीच होऊनी
भेगाळल्या जिवना धीर देत मी
मीच चाललो माझे बोट धरुनी


Rate this content
Log in