माझे जीवनगाणे ( कविता )
माझे जीवनगाणे ( कविता )
1 min
277
कुणाचा तरी आधार
कुणाचे तरी तराणे
स्वैर ना व्हावे तरी
माझे जीवनगाणे...
उन्हाची ती सावली
थांबवावे रडगाणे
हास्य चेहरा फुलवावे
माझे जीवनगाणे...
मित्रांची मैफिल बहार
जगावे त्याच धुंदीने
नाव सदा त्यात निघावे
माझे जीवनगाणे...
संपलेला दिवस
क्षण परी थांबणे
वाट पाहत उभे
माझे जीवनगाणे...
