STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

माझे बाबा......

माझे बाबा......

1 min
14.2K


आईची महती आईची गाणी

नकळत डोकावले माझ्या बालपणी

दिसले मला माझे बाबा

अन् त्यांच्या आठवणी

 

पाठीचा मी बाबांच्या

केला घोडा घोडा

दमल्यावर ते म्हणायचे

थांब बाळा थोडा

 

बाबांच्या हातात माझा

चिमुकला हात

दुडूदुडू धावतांना

त्यांनीच दिली साथ

 

बाबांचा राग माझ्या

पाहीला नसेल कुणी

जणू नारळ कडक

आत गोड पाणी

 

गाईली नसेल अंगाई

म्हटली नसतील गाणी

कुशीमध्ये शिरुन ऐकली

जादूची कहाणी

 

सांभाळले त्यांनी

साऱ्या घरदारा

पंखाखाली मिळत असे

निवांतसा निवार


Rate this content
Log in