माझा गावच बरा होता
माझा गावच बरा होता

1 min

11.9K
ते भलंमोठं अंगण,
अंगणात बांधल्या म्हशी न गाई..
न त्यांची धार काढणारी,
प्रेमळ त्या घरातील बाई .
अंगणात होती तुळस ,
पडला फुलांचा तो सडा...
सुगंध पसरला दहिदिशा,
मोगरा,रातराणी अन तो केवडा.
धरतीचा परिमय,
सुटलाय सारा शिवारात...
मंजुळ वाणीचे पक्षी ,
गुज करताय स्वरात.
गातोय गडी
जशी चालती तिफन..
प्रत्येक बियाणाला हाये,
त्याच्या मायेची गुंफण.
कल्पनेतील सार चित्र,
गड्या पण तो काळच खरा होता ..
अस वाटत कधीकधी,
आपला गावच बरा होता.