माहेर
माहेर
1 min
258
मन माझे धावे वेगे
कितीही असले सुखात
ओढ माहेरची भरून येते
मन जरी असले आनंदात
आठवणींचा येतो उमाळा
येतो कंठ दाटून माझा
गहिवरले मन माझे
आठवे मज माहेर माझा
आईची ती प्रेमळ हाक
ऐकू यई मज सदोदित
वाट पाहते मी मुरारी
कधी मज घेण्यास धावत
सासर आणि माहेर माझे
मंगळसूत्रच्या दोनवाट्या
हळदी कुंकवाने भरलं माझे
सौभाग्याचे दान देण्या
जपते मी जीवापाड नाती
जशी गुंफली सूत्रात फुले
नात्यांची करून जडणंघडणं
झाली माझ्याच अश्रूंची फुले
