लॉकडाऊन डायरी -अनुभव
लॉकडाऊन डायरी -अनुभव
1 min
344
अनुभव आले खूप
लॉकडाऊन झाल्याने
जगणे म्हणजे काय ते
कळले आज नव्याने
घरच्या जेवणाची चव
जीभेवर रेंगाळली
बायकांची किंमत
आज पुरुषांना कळली
पैशांचा माज करणाऱ्यांचा
गर्व कमी झाला
निसर्गाने गरीब, श्रीमंत
एका तराजूतच तोलला
कमीत कमी वस्तू वापरून
जीवन जगता येते छान
दिलायं धडा निसर्गाने
ठेवू आपण सारे भान