STORYMIRROR

Smita Murali

Others

0.8  

Smita Murali

Others

लोकशाही

लोकशाही

1 min
3.8K


एक हाती सत्ता जेथे

तेथे फक्त हुकूमशाही

लोकहिताचा विचार करुनी

लोकच चालवी लोकशाही


आम्ही सारे असू भारतीय

स्विकारली आम्ही लोकशाही

न्याय, समता, स्वातंत्र्य एकता

व्यक्तीहितच असे येथे सर्वकाही


राष्ट्रभक्ती अन् राष्ट्रसेवा

आम्ही भाव हा मनी जपतो

संविधानाचे महत्व जाणूनी

माणूसकीने सदैव जगतो


कधी होतो येथेही अन्याय

नराधम इथेही अत्याचारी

कायदा सुव्यवस्थेच्या मदतीने

न्याय दिला जाई व्यवहारी


नकोत नुसत्या अपेक्षा पोकळ

नकोत नुसते ठेवायची नावे

लोकशाहीत लोकांना लोकांनीच

संरक्षित जगणे द्यायला हवे


हक्कासाठी उठावे पेटून

पण कर्तव्याचीही हवीच जाण

लोकशाही वरदान मानूनी

लोकहिताचेही ठेवू हो भान!!!



Rate this content
Log in