STORYMIRROR

Vanita Shinde

Others

5.0  

Vanita Shinde

Others

लळा

लळा

1 min
1.0K


विरहात साजना तुझ्या

झुरते मन रे क्षणोक्षणी,

आतुर लोचन तुजसाठी

अश्रु वाहती नयनातूनी..


मेघ दाटूनी आठवांचे

झाले विचार रे स्तब्ध,

विरह तुझा मांडताना

शब्द ही झाले नि:शब्द.


ओढ लागली रे भेटीची

उरले ना मज काही भान,

होते तडफड अंतरी या

निष्प्राण वाटते हे जीवन..


जातो गुदमरुनी जीव

या समाज बंधन रितीत,

श्वास मोकळा देण्यासाठी

ये तू धावून होऊन मित..


तुजविन निरर्थ हे जगणे

लागला फक्त तुझा लळा,

रुक्ष वाटणाऱ्या जीवनी

फुलव प्रितीचा रे मळा..



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్