लिलाव
लिलाव
माणूसकी लिलाव होते
येत्या जात्या रस्त्यावर
भावना दळल्या जातात
मोहरुपी जात्यावर
गुलामीचा धंदा पहा
जोमाने बहरला आहे
इथे प्रत्येक माणूस
गुलामीचा फरीस्ता आहे
आर्थिक गुलामगिरी
जन्म सिद्ध अधिकार आहे
बोनस म्हणून प्रत्येक वाट्याला
मानसीक गुलामगिरी आहे
कोण म्हनतो आज
आम्हची आत्मा जागी आहे
बंद पिंजऱ्यातील फळे
किती रसाळ गोंमटी आहे
इज्जतीचा आव पहा
प्रत्येकाच्या डोक्यावर आहे
भकास भिभत्स चष्मा
प्रत्येकाच्या डोळ्यावर आहे
विश्वासाची पट्टी बांधून
जग पुढे चालला आहे
अंधारलेल्या वाटेवर
नवी उमीद शोधत आहे
चारी बाजूस दलाल बसले
सौदा चोक होणार आहे
या भरल्या बाजारात
माणूसकी विकणार आहे
आणि याचा आनंद
आम्ही सारे घेणार आहे
आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांना
नावं ठेवून पुढं पुढं चालणार आहे
