लहानपण
लहानपण


लहानपणीची ती आस
आहे सतत फसवत
कधी निसटले दिस
हळूवार होई भास
कधी चिमुकली पावलं
रूनझुन गुंगरांची
आता झाली लेक मोठी
नाही घरात सावली
लहापणापासूनच होते
लेक ती हुश्शार
मोठी नवलाई सांगे
बाप तिचा तो खुशीत
सांगे आज्जी गुजगोष्टी
सारे जमता नातवंडं
काय सांगू मारामारी
कशी झोंबती भावंड
आता लेकरांना शाळा
लहान पण गेले वाया
आजच्या अजब दुनियेचा
खेळ कसा मांडियेला
नको दुधावर साय
आता लेकरांना कुण्या
भांडी पूर्वी घरोघरी
भावंडे ही पुन्हा पुन्हा
लहान पणाचे आयुष्य
वाटे मज ते समीप
त्याच निर्मळ जगाचे
होई भास सदोदित
);"> लहान पण लहान पण
लहान पण
किती बिलगून
बसले लहान पण
त्या वेड्या पाऊलखुणा
अद्भुत संगम सर्वांचा
खेळी खेळ नवा नवा
होता खाण्याचा तो हेवा
कधी गल्लीतले खेळ
कधी झाडावरची बोर
कुठे गेले नाही सगळे
केली वेळेनी ही भेळ
लुपाचुपी आणि लंगडी
सारीपाट किती भारी
माझ्या मित्र मैत्रिणींनी
साद द्यावी मला प्यारो
सणासुदीला भेटती
नवीन कपडे नी खाऊ
बाप नावाचा माणूस
घाली आनंदाने न्हाऊ
आई करते हो लाड
लहानपणी तीच गोड
बाबा काही सांगायला
मनी होई हो धड धड
कसे लहान पण बाई
आता वागू कसे लहान
लोक म्हणायचे काय
म्हणू देत ते मोठे महान...