लग्नसराईचे बदले रूप
लग्नसराईचे बदले रूप


लग्न म्हणजे दोन जीवाचे मिलन आणि दोन कुटूंबाला धागा जोडणारा
पण काळा नुसार लग्न म्हणजे झाला आहे पैशाचा बाजार दाखवणारा
भरजरी कपडे सोना चांदीच्या दागिने कलाकृतीच्या पत्रिका
झगमगीत सजावट असंख्य निमंत्रक आणि उत्कृष्ट मेजवानीचा मेळ
लाखोंची उलाढाल मोठेपणा चा तुरा मिरवणारा
यात मात्र गरीब बिचारे भरडले जातात
कर्ज काढून आपल्या परीने ते कार्य आटोपतात
पण आता मात्र दिवस बदले
कोरोनापायी निमंत्रकांची संख्या आली ५० वरती
झगमकटीतुन साधेपणकडे लग्नांनी कात टाकली
सध्या पणाने होऊ शकते जे कार्य उगीच होता त्यात मोठेपणाचा माज
लाखोंची लग्न आता हजारावर होऊ लागली
सगळीच जण आता झगमगाटीतुन साधेपणाकडे वळू लागली