Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Priyanka Kumawat

Romance

4.0  

Priyanka Kumawat

Romance

लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस

लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस

1 min
199


नवीन नवीन संसार

नवीनवी ती हुरहूरी

सतत मनात वाटे

किती ही बैचेनी

सगळ्यांच्या चोरून

नजर मिळे नजरेला

हलकेच डोळा मारून

साजन छेडे साजनीला

कामे करताना तिला

पदर नीट आवरेना

नटल्याशिवाय ती

त्याच्यासमोर येईना

रडू येई साजनीला

आठवून तिचे माहेर

साजन समजून घेई

घाली प्रेमाची फुंकर

नव्या नवलाईचे

नऊ हे दिवस

सदा राहतात आठवणीत

हे सोनेरी दिवस


Rate this content
Log in